No title

जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया पतंगा मैदान, आमगांव रोड, फुलचूर, गोंदिया

E-mail dpc.gon@gmail.com

दुरध्वनी क्र.07182-233297

क्र. जिनिस/गों//ज्ञापन/उजोपं/2026/412.

दि. 23/07/2026

प्रति,

उमेश जो. पंधरे

लेखाधिकारी,

जिल्हा नियोजन समिती, गोंदिया

विषय- आपणाकडून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 चे उल्लंघन होत असल्याबाबत

उपरोक्त विषयान्वये या कार्यालयाच्या निदर्शनास असे आले आहे की, आपल्या बदलांचे आदेश दि. 03.06.2026 रोजी आल्यापासून व आपणास कार्यमुक्त न केल्याने कार्यालयात आपली वर्तणूक शासकीय कार्यालयात साजेशी अशी नाही. आपणाकडून अकारण नस्तो अडवणे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल असे नस्तीवर नकारात्मक शेरे लिहणे, नस्तीवर सही करण्यास नकार देऊन नस्ती परत करणे, कार्यालयात दारू पिऊन येणे, तंबाखूयुक्त गुटका खरांच्या आहारी जाऊन आपल्या टेबलजवळील कचरापेटी/डस्टबीनमध्येच धुंकून घाण करणे, कार्यालयातील कनिष्ठ कर्मचारी / अधिकारी वार्षिक सभेच्या तयारी करण्यात व्यस्त असूनही त्यांचेशी सादर केलेल्या नस्तीवरून क्षुल्लक कारणावरुन शाब्दिक बाचाबाची करणे अशाप्रकारचे शासकीय कार्यालयात आपण अशोभनीय वर्तन करत आहात. आपणांविरोधात प्रामुख्याने खालील मुद्यावर या कार्यालयास हरकती आहेत

1. कार्यालयात उशिरा येणे व कार्यालयीन वेळेत न विचारता कुठेही निघून जाणे

आपण दररोजच कार्यालयात उशिरा येत असता. आपणास वेळोवेळी कार्यालयात वेळेवर येणेबाबत तोंडी सांगितले असता त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असता. याआधीही तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी श्री मुरलीनाच वाडेकर यांनी दि. 08.04.2026 रोजी आपणास याबाबतीत ज्ञापन दिलेले आहे. कार्यालयीन वेळेत आपण न विचारता बाहेर निघून गेल्यास भविष्यात आपणासोबत काही अपघात किंवा बरे-वाईट झाल्यास संपूर्ण जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

2. स्वतःचा कक्षात दररोज दिवसभर कंत्राटदारांची बैठक बोलाविणे

या कार्यालयाच्या असे निदर्शनास येते की कार्यालयीन वेळेत नेहमीच आपल्या कक्षात आपण कंत्राटदारांची बैठक बोलवित असता. नेहमीचे चार ते पाच कंत्राटदार आपल्या कक्षात असतात. यावरुन आपण त्यांचे काम करुन देण्याच्या बदल्यात आपले काही आर्थिक हितसंबंध गुंतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

3. कार्यालयीन वेळेत शेअर मार्केटमध्ये ऑपशन ट्रेडींग करणे

आपण कार्यालयीन वेळेत आपल्या मुलीच्या SBI Securities या Demat Account वरुन Option Trading करत असता. या Trading मध्ये व्यस्त असल्याने कित्येक वेळी नस्तीवर वेळेवर सहया करत नाही. आपल्या या सवयीमुळे फेब्रुवारी ते मार्च महिण्यात तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी श्री मुरलीनाथ वाडेकर यांनी आपणाकडून 150 ते 200 नस्त्या स्वतःकडे ओडून घेतल्या होत्या. बाहस्य कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरविण्याची नस्ती आपणाकडे तात्काळ सहीसाठी पाठविली असता आपण शिपायाला अर्ध्या तासानंतर येण्यास सांगितले होते. कदाचीत आपण ऑप्शन ट्रेडींग करण्यात व्यस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, नस्ती तात्काळ मा. जिल्हाधिकारी महोदयाकडे सादर करावयाची असल्याचे सांगत आपणाकडे पुन्हा पाठविली असता आपण लेखाशिर्ष नमूद नसल्याचे कारण लिहून नस्ती अडविण्याचे कार्य केले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या 01.07.2026 च्या टिपणीत लेखाशिर्ष नमूद नसतांनासुद्धा आपण नकारात्मक शेरे मारले नव्हते. अर्थात आपण स्वतःच वेगवेगळ्या वेळी स्वतःशीच विरोधाभास निर्माण केला आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post