No title

*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार राजेंद्र जैन यांनी मांडल्या विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण सूचना* 

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार श्री राजेंद्र जैन यांनी जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषय उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

यावेळी गोंदिया (कुडवा) येथे खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल कॉलेज)  निर्माणाधीन कामाची सद्यस्थिती काय ? कामातील प्रगती व उर्वरित कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करून तातडीने पूर्ण करण्याबाबतही त्यांनी आढावा घेतला. भूमिगत गटार (Underground Drainage) योजनेमुळे शहरातील अनेक रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय गोंदिया शहरासाठी प्रलंबित ऑडिटोरियमच्या अतिरिक्त निधी मंजूर असून तो तातडीने निकाली काढून कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. तसेच भीमनगर–कुंभारेनगर रेल्वे क्रॉसिंग येथे प्रस्तावित अंडरपासऐवजी नागरिकांच्या सुरक्षिततेचा व भविष्यातील वाहतूक गरजांचा विचार करून उड्डाणपूल उभारण्यात यावा तसेच परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर पवित्र अस्थी भीमघाट, गोंदिया,  श्रीकृष्ण गौरक्षण, गौशाला परिसर पांजरापोल, गडमाता डुडुमाई देवस्थान, झालुटोला व कोरणी घाट यासह अन्य तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून विकासकामांना गती देण्याची मागणीही त्यांनी बैठकीत केली.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post