माझं गाव आरोग्य संपन्न गाव​ सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य नेत्र व एनसीडी तपासणी शिबिर संपन्न; १३० रुग्णांची तपासणी, ७० रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान​ सारस एक्सप्रेस (प्रतिनिधी गोरेगांव):

​सारस एक्सप्रेस (प्रतिनिधी गोरेगांव):
'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) सोनी येथे समता फाउंडेशन आणि पीएचसी सोनी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व एनसीडी (नॉन-कम्युनिकेबल डिसीझेस) स्क्रीनिंग आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
​मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व वृक्षारोपण
​या विशेष आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य तथा जन आरोग्य समिती सोनीचे अध्यक्ष माननीय श्री. पंकजभाऊ रहांगडाले आणि गोरेगाव पंचायत समितीचे सदस्य माननीय श्री. किशोरजी पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध वैद्यकीय सेवा-सुविधांची सविस्तर माहिती घेत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
१३० रुग्णांची तपासणी आणि आरोग्य सेवा
​या एकदिवसीय शिबिरामध्ये एकूण १३० रुग्णांची नोंदणी (Footfall) झाली. शिबिरादरम्यान खालीलप्रमाणे वैद्यकीय तपासण्या व सेवा पुरविण्यात आल्या:
​एनसीडी स्क्रीनिंग: एकूण १२२ नागरिकांची उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) तपासणी करण्यात आली. यासाठी सर्व उपकेंद्रांचे स्वतंत्र स्टॉल्स लावण्यात आले होते.
नेत्र तपासणी व मोतीबिंदू: नेत्र तपासणी दरम्यान ७० रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे (Cataract) निदान झाले असून, त्यांच्यावर पुढील उपचाराची प्रक्रिया केली जाणार आहे.
इतर चाचण्या: ६ रुग्णांची तातडीने ईसीजी (ECG) तपासणी करण्यात आली, तर १९ रुग्णांचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी (HLL) घेण्यात आले.
​अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देव चांदेवार यांनी केले. त्यांनी शिबिराचा उद्देश आणि आरोग्य संपन्न गाव मोहिमेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती सत्वशीला पारधी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार औषध निर्माण अधिकारी श्रीमती कुमुद बावणकर यांनी मानले.
​शिबिर यशस्वी करण्यासाठी द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. नितेश लांजेवार, मोहगाव उपकेंद्राचे सीएचओ डॉ. आशिष रहांगडाले, हिरडामाली उपकेंद्राचे सीएचओ डॉ. आशिष मेश्राम, आरोग्य सहायक श्री. डोंगरे, तसेच सर्व उपकेंद्रांच्या एएनएम (ANM), एमपीडब्ल्यू (MPW) आणि ब्लॉक फॅसिलेटर यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना गावातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post