आई, मला तिकडे खूप दुखतंय....! समोर आला एक धक्कादायक प्रकार सारस एक्सप्रेस नेटवर्क

       सारस एक्सप्रेस नेटवर्क 
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून अशीच काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे ३० वर्षांच्या एका नराधम सावत्र बाप पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याऐवजी अवघ १० वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. मुलीचा चेहरा आणि तिला होणारा असह्य त्रास पाहून आईने तिला विश्वासात घेतले, अन् तिने सांगितलेले सत्य ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
 मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब रोजगाराच्या शोधात भोर तालुक्यातील एका गावी येऊन राहत होते. १८ आणि १९ जुलै रोजी घरात कोणीही नसल्याची संधी साधत या नराधम बापाने विकृतीची हद्द पार करत त्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. होणारा तीव्र शारीरिक त्रास आणि मानसिक धक्का सहन न झाल्याने मुलीने रडत रडत आपली आपबीती आईजवळ कथन केली. स्वतःच्याच नवऱ्याचे हे भयंकर रूप समोर आल्यानंतर आईत मोठा धक्का बसला, परंतु तिने क्षणाचाही विलंब करता अत्यंत धाडसी पाऊल उचलले आणि थेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध कायदेशीर तक्रार केली.
आईने दाखवलेल्या धाडसी निर्णयामुळे राजगड पोलिसांनी तात्काळ चक्रवेगात सूत्रे हालवली. पोलिसांनी या प्रकरणी कठोर पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्या नराधम सावत्र बापाला तात्काळ बेड्या ठोकल्या असून पोलीस प्रकरणाचा कसन तपास करत आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post