एसीबीची मोठी कार्यवाही, वनपाल, वनरक्षक तीन आरोपी फसले जाळ्यात सारस एक्सप्रेस गोंदिया

       सारस एक्सप्रेस गोंदिया 
गोंदिया जिल्ह्यातील वन विभागातील तीन वनपाल वनरक्षक यांना लाज मागितल्याप्रकरणी गोंदिया एसीबीने जाण्यात फासले आहे या कार्यवाहीने वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांच्या विरोधात कारवाई झाली त्यामध्ये
  रमेश सखारामजी पचारे, वय 57 वर्ष, पद- वनपाल, राजुली सावनक्षेत्र वनपरिक्षेत्र, गोठणगांव, ता. अर्जुनी मोरगाव, जिल्हा - गोंदिया.
रा- शिवाजी मंगल कार्यालय जवळ, साई कॉलनी, आष्टी, तालुका - आष्टी, जिल्हा - वर्धा 
ह. मु.- लांजेवार यांच्या घरी, आठवडी बाजार, किशोरी, जिल्हा गोंदिया 
 निलोत्पल  हिरालाल शिकारे, वय 31 वर्ष, पद - वनरक्षक, पारसटोला, वनपरिक्षेत्र, गोठणगांव, ता. अर्जुनी मोरगाव, जिल्हा - गोंदिया.
रा. शासकीय निवास्थान,किशोरी, जिल्हा गोंदिया 
3) चिंटू मंगलसिंग परिहार, वय 38 वर्ष, पद - वनरक्षक, राजुली सावनक्षेत्र वनपरिक्षेत्र, गोठणगांव, ता. अर्जुनी मोरगाव, जिल्हा - गोंदिया.
रा.  चीतुलेबाबू यांचे घरी, टीचर कॉलोनी, किशोरी, जिल्हा गोंदिया        
तक्रारदार यांचे घराचे बांधकाम सुरू असुन तक्रारदार हे मार्च 2026 मध्ये घरासाठी लागणारी रेती गावाशेजारील नाल्यातून आणत असताना यातील गैरहर्जदार श्री. पचारे राऊंड ऑफिसर यांनी तक्रारदार यांचा ट्रॅक्टर अडवून तुझ्यावर रेती उपसा व वाहतुकी बाबत कारवाई करतो असे सांगून कारवाई न करण्यासाठी 25 हजार रुपयाची मागणी केली. 
 दिनांक 9/7/2026 रोजी तक्रारदार यांनी रॉयल्टीची आणलेली वाळू घराकडे टाकून मोकळे ट्रॅक्टर शेताकडे घेऊन जात असताना यातील गैरराज श्री. पाचारे व श्री. शिकारे यांनी तक्रारदार यांचे ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टरची चावी काढून घेऊन, घराचे बांधकाम चालू केल्यापासून तू एकही रुपया दिला नाहीस असे म्हणून  तक्रारदार याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी  25 हजार रुपयाची मागणी केली व नाही दिलास तर केस दाखल करता असे म्हणून चावी देऊन रागाने निघून गेले. 
दिनांक 05/08/2026 रोजी गैर अर्जदार श्री पचारे यांनी तक्रारदारा यास 08/08/2026 रोजी राजोली परसटोला राऊंड ऑफिसर येथे हजर राहण्याबाबत नोटीस दिली असता तक्रारदार 08/08/2026 रोजी परसटोला राऊंड ऑफिस कार्यालय येथे हजर झाले असता श्री. पचारे व श्री. शिकारे साहेब यांनी आपण सेटलमेंट करू असे म्हणून  पंचवीस हजार रुपये ऐवजी वीस हजार रुपये द्यावे लागतील. असे म्हणून लाचेची मागणी केली तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दिनांक 10/08/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक गोंदिया येथे येऊन तक्रार सांगितली.
तक्रारदार यांनी दिनांक 10/08/2026 रोजी सांगितलेल्या तक्रारी प्रमाणे आज दिनांक 11/08/2026 रोजी पंचांसह परसटोला शेत शिवार परिसरात येऊन पंचांसमक्ष तक्रारदार यांची तक्रार लिहून घेऊन दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 11/08/2026 रोजी तक्रारदार यांना पंच व व्हाईस रेकॉर्डर सह गैरअर्जदार श्री.पाचारे व शिकारे यांच्या कडे राजुली, सावनक्षेत्र, पारसटोला कार्यालय येथे  लाच मागणी पडताळणी कामी पाठवले असता आरोपी क्रमांक एक, दोन व तीन यांनी तक्रारदार यांच्यावर रेती उपसा व वाहतुकी बाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी वीस हजार रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
गैरअर्जदार यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान केलेल्या 20,000/-रु ची मागणी संबंधाने दिनांक 11/08/2026 रोजी तक्रारदार यांना व्हॉइस रेकॉर्ड व पंचासह  लाच रक्कम घेऊन गैरअर्जदार यांच्या राजुली, सावनक्षेत्र, पारसटोला कार्यालय येथे पाठवले असता आरोपी क्रमांक 01 यांनी सदर लाच रक्कम 20,000/- रु,स्वीकारली आरोपी यांना रेड हॅन्ड  पकडण्यात आले आहे. तसेच त्याच वेळी आरोपी क्रमांक 2 व 3 सुद्धा समक्ष हजर होते त्यांना सुद्धा त्याच वेळी ताब्यात घेतले आहे.
    👉आरोपी ताब्यात  :-  
वरील नमूद 3 आरोपी यांना ताब्यात घेतले आहे. तीनही आरोपींच्या विरोधात केसोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 *यांनी केली रचला सापळा*  :-  निलेश लोधी, पोलीस उपअधीक्षक, उमाकांत उगले पोलीस निरीक्षक , अरविंद राऊत पोलीस निरीक्षक , Asi करपे, Hc बोहरे, Hc कहालकर, NPC शेंडे, NPC बोपचे, NPC कापसे, NPC काटकर, NPC सोनवणे , NPC बाटबर्वे, LNPC पटले, LNPC डांगे यांनी केली

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post