सारस एक्सप्रेस गोंदिया
श्रमिक पत्रकार संघ, गोंदियाच्या वतीने दरवर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्ष २०२६ च्या वृत्तवाहिनी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल *एबीपी माझा* या वृत्तवाहिनीचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांची निवड करण्यात आली. गोंदिया येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.... देवेंद्र रहांगडाले हे मूळचे गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील असून ग्रामीण भागातून येत त्यांनी *एबीपी माझा* सारख्या वृत्तवाहिनीत मागील चार वर्षांपासून उत्कृष्टपणे कार्य केले आहे. जनसामान्य नागरिकांच्या हक्काचा आवाज बनून अनेक लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून केले आहे. या कार्याची दखल घेत श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांना वृत्तवाहिनी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.. देवेंद्र रहांगडाले यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे....
Post a Comment