मुरदोली शिवारात अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमीसारस एक्सप्रेस गोंदिया

मुरदोली शिवारात अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
सारस एक्सप्रेस गोंदिया 
देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुरदोली शिवारात बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संबधित अज्ञात वाहन घटनास्थळावरून निघून गेले.
मृत व्यकीचे नाव जयपाल राऊत (५८), रा. म्हसवाणी, ता. सडक अर्जुनी असे अशून, विनोद राऊत (३५), रा. म्हसवाणी, ता. सडक अर्जुनी हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपाल राऊत व विनोद राऊत हे येरू साल्या आणण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच ३५ एन ६७९१ ने गावावरून राष्ट्रीय महामार्गाने निघाले होते.
त्यांच्या मागोमाग गावातील काही सहकारी दुस्त्या दुचाकीने जात होते. मुरदोली शिवारात पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात जयपाल राऊत यांचा मृत्यू झाला. विनोद राऊत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना १०८ रुग्णवहिकेच्या मदतीने गोंदिया येथे
पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. जयपाल राऊत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय, देवरी येथे दाखल करण्यात आला.
अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याचा शोध घेण्याचे काम पोलीसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे म्हसवाणी परिसरात हळहळ व्यक्त होत अशून, राऊत कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. घटनेचा पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post