गोंदिया एसीबी ची कार्यवाही, सारस एक्सप्रेस गोंदिया

           सारस एक्सप्रेस गोंदिया 
जिल्हा हिवताप कार्यालयात गोंदिया एसीबीने सापळा रचून लोकसेवक यांना 7000 हजार रुपयाची लाज स्वीकार करताना रंगेहात पकडण्यात आले ही कार्यवाही सोमवार 24 ऑगस्टला करण्यात आली. आरोपीचे नाव
 1)  मारुती यादव दिपेवाड, वय 39 वर्ष, पद- आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप कार्यालय, गोंदिया  तालुका.जिल्हा - गोंदिया.
रा- हरफड, तालुका माहूर, जिल्हा नांदेड
ह. मु.- पारधी हाऊस, न्यू लक्ष्मी नगर, बाहेकर नर्सिंग होमच्याजवळ, गोंदिया.
2) नीरजकुमार नरेश अग्रवाल, वय  40 वर्ष, पद- वरिष्ठ लिपिक, जिल्हा हिवताप कार्यालय, गोंदिया, तालुका.जिल्हा - गोंदिया. 
रा. मारोती अपार्टमेंट,  अंगूर बगीचा रोड, गोंदिया, तालुका.जिल्हा - गोंदिया. 

तक्रारदार यांचे वडील हे जिल्हा हिवताप विभागात आरोग्य सेवक या पदावरून नियमित वयोमानाने सन 2016 मधे सेवानिवृत होऊन फेब्रुवारी 2026 मधे मरण पावले आहेत.  
वडिलांचे मृत्यु नंतर तक्रारदार हे त्यांचे आई चे कुटुंब निवृति वेतनबाबत  माहिती विचारण्या करीता मार्च /2026 मधे जिल्हा हिवताप कार्यालय गोंदिया येथे गेले असता आरोपी क्रमांक 2 यानी तक्रारदार यांना तुमच्या वडिलांचा नक्षल प्रोत्साहन भत्याचे एरियस बिल देखील आहे ते काढुन देतो त्यासाठी रु 6000/- द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे     त्यांचे वडिलांचे नक्सल प्रोत्साहन भत्याचे एरिअस बिल निघाले नसल्यामुळे जून 2026 मधे आरोपी क्रमांक  2 याना भेटण्यास गेले असता त्यानी त्यांचे कार्यालयातील आरोपी क्रमांक 1 याना भेटण्यास सांगितले असता तकरादर हे आरोपी क्रमांक 1 याना भेटले असता आरोपी क्रमांक 1 यानी  सुद्धा तक्रारदार याना एरियस बिल काढुन देण्या करीता 7000/- लाचेची मागणी केली. 
त्यानंतर दिनांक 21/08/2026 रोजी तक्रारदार यानी आरोपी क्रमांक 1 याना एरियस बिल बाबत पुन्हा विचारणा केली असता आरोपी क्रमांक 01 यानी तक्रारदार यांना 7000/-  रूपये द्यावे लागतील असे म्हणुन लाचेची मागणी केली तक्रारदार याना लांच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दिनांक 24/08/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे येऊन तक्रार दिली
तक्रारदार यांनी दिनांक 24/08/2026 रोजी सांगितलेल्या तक्रारी प्रमाणे आज दिनांक 24/08/2026 रोजी तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरिता  तक्रारदार यांना पंच व व्हाईस रेकॉर्डर सह गैरअर्जदार यांचे कार्यालयात  लाच मागणी पडताळणी कामी पाठवले असता आरोपी क्रमांक 01 यातील तक्रारदार यांचे नक्षल प्रोत्साहन भत्ता बिलाचे काम करून देण्यासाठी सात हजार रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. 
तसेच यातील आरोपी क्रमांक दोन यांनी आरोपी क्रमांक एक यांना लाच स्विकारायला प्रोत्साहन दिले.
गैरअर्जदार यांनी लाच मागणी पडताळणी दरम्यान केलेल्या 7,000/-रु ची मागणी संबंधाने दिनांक 24/08/2026 रोजी तक्रारदार यांना व्हॉइस रेकॉर्ड व पंचासह  लाच रक्कम घेऊन गैरअर्जदार यांच्या जिल्हा हिवताप कार्यालय येथे पाठवले असता आरोपी क्रमांक 01 यांनी सदर लाच रक्कम 7,000/- रु स्वीकारली. आरोपी यांना रेड हॅन्ड  पकडण्यात आले आहे. तसेच त्याच वेळी आरोपी क्रमांक 2  हे  सुद्धा कार्यालयात  हजर होते त्यांना सुद्धा त्याच वेळी ताब्यात घेतले आहे. आरोपी लोकसेवक यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन गोंदिया शहर, ता.जिल्हा - गोंदिया येथे गुन्हा नोद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post