पिंडकेपार येथे अंगणवाडी केंद्रात ‘वेलकम मेळावा’ उत्साहात साजरा; सरपंच व उपसरपंचांच्या हस्ते फित कापून शुभारंभ सारस एक्सप्रेस प्रतिनिधी गोरेगाव :

   सारस एक्सप्रेस प्रतिनिधी गोरेगाव :
एकात्मिक बाल विकास प्रकल्प गोरेगावच्या वतीने तालुक्यातील पिंडकेपार येथील स्थानिक अंगणवाडी केंद्रात नवीन प्रवेशित चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी ‘वेलकम मेळावा’ (स्वागत सोहळा) अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ गावचे सरपंच योगिता ताई शहारे,आणि उपसरपंच भरतराम घासले, वनरक्षक रणजीत पटले यांच्या हस्ते फित कापून अधिकृतपणे करण्यात आला.
चिमुकल्यांचा आनंदोत्सव आणि स्वागत दीर्घ सुट्ट्यांनंतर किंवा पहिल्यांदाच अंगणवाडीची पायरी चढणाऱ्या लहान मुलांच्या मनात अंगणवाडीबद्दल गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडी केंद्र फुगे आणि रंगीबेरंगी साहित्याने आकर्षक रीत्या सजवण्यात आले होते. पहिल्यांदाच अंगणवाडीत आलेल्या चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.मान्यवरांचे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सरपंच योगिता ताई शहारे यांनी सांगितले की, "अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास योग्य पद्धतीने होतो." तर उपसरपंच भरतराम घासले यांनी अंगणवाडीच्या उपक्रमांचे कौतुक करत, अंगणवाडी केंद्रातील कार्यरत सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून चिमुकल्यांना चांगले संस्कार पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून अंगणवाडीच्या विकासासाठी आणि बालकांच्या आरोग्यासाठी नेहमीच सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. या दरम्यान पर पर्येक्षिका  जी टी पारधी, जीप शिक्षक हरीणखेडे,अंगणवाडी सेविका नानेश्वरी टेंभरे, लीला पटले, स्वर्णलता टेंभुर्णीकर, उमेश्वरी हरिणखेडे, कुंतन डहाके, छाया बिसेन, अंगणवाडी मदतनीस भूमेश्वरी चौधरी, ललिता राऊत, रेवन येडे, आशा सेविका ज्ञानेश्वरी बिसेन , पालक वर्गामधून मीनाक्षी बघेले, अंजीता देशमुख, ओमेश्वरी रहांगडाले सरिता बिसेन, लक्ष्मी देशमुख ,आरती बोपचे , जयमाला गौंदर्य, वर्षा बिसेन, झेलनबाई रहागडाले, शेवंता सरनागत, छाया राहंगडाले, योगेश्वरी रहांगडाले, खेमेश्वरी बिसेन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंगणवाडी सेविकेने उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण पिंडकेपार व कनारटोला गावात या अनोख्या आणि आनंदी स्वागत सोहळ्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post