2 ऑक्टोबर ला दुर्गाप्रसाद ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजसेवी कार्यक्रमाचे आयोजन.
गोंदिया
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक आणि गोंदिया जिल्ह्यातील युवा नेते, जनतेचा कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व समाजसेवक दुर्गाप्रसाद भाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 2 ऑक्टोंबर ला सकाळी 11 वाजेपासून गोरेगाव तालुका अंतर्गत कुराडी येथील रामकृष्ण विद्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आलेला आहे. उत्कृष्ट पत्रकार, क्रिएटर, विविध सेवा सहकारी संस्था, भजन मंडल यांना साहित्य वाटप यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात आयुष्यमान आभाकार्ड चे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे.
याशिवाय सुप्रसिद्ध शाहीर पुरुषोत्तम खाडेकर यांचा मनोरंजनात्मक तमाशाचा कार्यक्रम त आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होणार असल्याची माहिती त्यांच्या हितचिंतक कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेली असून मोठ्या संख्येत क्षेत्रातील नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.
Post a Comment