सारस एक्सप्रेस गोंदिया
गोंदिया, ता. ३० : ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत कर वसुली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली करून करमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. मधुकर वासनिक यांनी केले.
बुधवारी (ता. २८) ग्रामपंचायत बोटे येथील कर वसूली पथकाला जिल्हास्तरीय समितीने आकस्मिक भेट दिली. त्यावेळी संवाद साधतांना ते बोलत होते. याप्रसंगी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. डॉ. तानाजी लोखंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री विजय लोंढे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय प्रकाश ताकसांडे उपस्थित होते. १७ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून करवसूलीचे नियोजन करून शंभर टक्के उद्दीष्ट गाढण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
महाराष्ट्र शासन राजपत्र महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (दुरुस्ती) नियम दिनांक 31 डिसेंबर 2015 अन्वये आपण आपल्या अधिनस्त ग्रामपंचायतीध्ये कर आकारणी केली असावी. करवसुली करीता ग्रामपंचायतींचे नियमित प्रयत्न आहेत. त्यातच गोंदिया जिल्हयातील अनेक ग्रामपंचायती आर्थीक वर्षाच्या सुरुवातीलाच शंभर टक्के कर वसुली करतात. ही आनंदाची बाब असल्याचे देखील मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायत बोटे येथे कर वसुली पथकासह जिल्हास्तरीय समितीने भाग घेतला.
ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, जलसुरक्षक, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, उमेद सीआरपी ईत्यादी कर्मचारी यांचे पथक गठीत करावे. या पथकामार्फत दररोज सकाळी आणि सांयकाळी गृहभेटी घेवून करवसुली करावी, असे आवाहनही श्री. मधुकर वासनिक यांनी केले.
Post a Comment