वाचन संस्कृती टिकवणे काळाची गरज – जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे

       सारस एक्सप्रेस गोंदिया 
गोरेगाव,दि.०३: ज्ञान आणि संस्कृतीचे केंद्र असलेल्या 'अ' दर्जा प्राप्त आदर्श सार्वजनिक वाचनालय, मोहाडी येथे वाचनालयाचा ४५ वा वर्धापन दिन २ ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरेगाव तालुका खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष जगदीश येरोला होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते

👉मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला सेवानिवृत्त प्राचार्य जे. डी. जगणित, 'माऊली फाउंडेशन'चे अध्यक्ष आनंद चंद्रिकापुरे, गोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यु. टी. बिसेन, खरेदी-विक्री संस्थेचे संचालक ॲड. पी. सी. चव्हाण, सहकारी संस्था पिंडकेपारचे अध्यक्ष धनलाल बिसेन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. के. बिसेन, मोहाडीचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लोकीराम धपाडे, पोलीस पाटील राजेश येळे, उपसरपंच खेमराज वाकले आणि संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
👉स्पर्धेच्या युगात वाचनाशिवाय तरणोपाय नाही:
मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी खोमेंद्र बोपचे यांनी ग्रंथालयाच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "ग्रंथमित्र स्व. वाय. डी. चौरागडे गुरुजी यांनी २ ऑक्टोबर १९८१ रोजी मोहाडीसारख्या ग्रामीण भागात या ग्रंथालयाची पायाभरणी केली. आज या ग्रंथालयाने मोठी प्रगती केली आहे. आधुनिक भारताची निर्मिती ग्रंथांमुळेच झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधले; आपणही नियमित वाचक बनून आपली ज्ञानसंपदा वाढवली पाहिजे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात तरुणांना वाचनाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे."
अध्यक्षीय भाषणात जगदीश येरोला यांनी ३००० स्क्वेअर फूट जागेत बांधलेल्या या भव्य वाचनालयाचे आणि त्याच्या ४५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त प्राचार्य जे. डी. जगणित यांनी पालकांनी आपल्या मुलांना नियमित ग्रंथालयात वाचनासाठी पाठवावे, असे आवाहन केले.
👉स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानकेंद्र:
प्रस्ताविकातून मोहाडीचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी ग्रंथालयाचा प्रगती अहवाल सादर केला. वाचनालयात दररोज सुमारे ३० विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर महाजन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष जे. जे. पटले, वाय. एफ. पटले, डी. आर. चौरागडे, सुभाष चौरागडे, हिरालाल महाजन, चंद्रकुमार चौरागडे, प्रेमानंद तिरेले, कमलेश पटले, आशा चेचाने, मीनाक्षी चौधरी, वैशाली चौरागडे आणि वंश मोहनकार यांनी सहकार्य केले. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ, वाचक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post