जागतिक आदिवासी दिवस निमित्त पिंडकेपार येथे मोफत नेत्र तपासणी सारस एक्सप्रेस गोंदिया

         सारस एक्सप्रेस गोंदिया 
संपूर्ण जगात ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे आदिवासी समाजकडून ९ ऑगस्ट रविवार रोजी मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येत आहे त्या निमित्ताने गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व गरजूंना मोफत डोळ्याचे ऑपरेशन करण्याची सुविधा मिळणार आहे. तरी सर्व पिंडकेपार वासियांना आवाहन करण्यात येत आहे की जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात येऊन आपल्या डोळ्याची तपासणी करावी असे आव्हान पिंडकेपार येथील सर्व आदिवासी समाजाकडून करण्यात आले आहे विशेष उल्लेखनीय की जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post