//प्रेस नोट//
गोंदिया जिल्हयाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
मा. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 19 ऑगष्ट 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारीत कार्यक्रम अन्वये दिनांक 31.08.2026 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. या प्रारुप मतदार यादीत जिल्हयातील एकुण 11,23,805 मतदारांचा समावेश आहे. नागरीकांनी प्रारुप मतदार यादीत आपले नाव तपासुन आवश्यक दावे व हरकती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करावे असे आव्हान जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणुक अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
प्रारुप मतदार यादीनुसार जिल्हयात एकुण 9,63,159 (85.71%) एवढे मतदार आहेत. त्यात मतदार संघ 63 अर्जुनी मोरगांव मध्ये 2,29,882 (88.71%), 64 तिरोडा मध्ये 2,22,553 (83.08%), 65 गोंदिया मध्ये 2,68,237 (82.29%), 66 आमगांव मध्ये 2,42,487 (89.54%) एवढे मतदार संघ निहाय मतदार आहेत.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गृहभेटी दरम्यान मृत कायमस्वरुपी स्थलांतरीत, गैरहजर अथवा सापडू न शकलेले. दुबार किंवा अन्य ठिकाणी नोंदणी असलेले अशा एकुण 1,60,646 (14.29%) मतदारांची यादी संकेतस्तळावर उपलब्ध आहे. प्रारुप मतदार यादी दिनांक 31.08.2026 रोजी जिल्हास्तरावर व सर्व मतदार संघ निहाय प्रसिध्द करण्यात आली व त्याअनुषंगाने सर्व राजकीय पक्ष यांची दिनांक 31.08.2026 रोजी दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणुक अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
दावे व हरकतीसांठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत संधी नागरीकांना प्रारुप मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती दिनांक 31 ऑगष्ट 2026 ते दिनांक 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत संबधीत मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे सादर करता येतील.
Post a Comment