प्रदेश सचिव पदी चेतन वळगाये यांची निवडसारस एक्सप्रेस नेटवर्क गोंदिया

   सारस एक्सप्रेस नेटवर्क गोंदिया 
नुकत्याच पार पडलेल्या भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रदेश अध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार आदिवासी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.त्यात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीच्या सचिव पदी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील रहिवासी असलेले सडक अर्जुनी पंचायत समिती चे सभापती चेतन वळगाये यांची निवड करण्यात आली. गेल्या 25 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता व आदिवासी समाजातील मुख्य घटक म्हणून त्यांची ओळख आहे.म्हणुन आदिवासी समाजाला अधिक बळकट करुन भारतीय जनता पार्टी च्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आदिवासी समाजाच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याकरिता अधिक मदत होण्याच्या दृष्टीने चेतन वळगाये यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीच्या सचिव पदी निवड करण्यात आली.त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय जिल्हा अध्यक्ष सिताताई रहांगडाले,संघटन मंत्री बाळा अंजनकर , आमदार डॉ परिणय फुके , आमदार अविनाश ब्राम्हणकर, आमदार,संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल , जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर माजी आमदार हेमंत पटले,खोमेश रहांगडाले,भेरसींह नागपुरे,केशव मानकर,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हनवंत वट्टी तसेच भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा सर्व पदाधिकारी यांना निवडीचे श्रेय दिले.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post