बोरगावात साथरोगाचा प्रादुर्भाव; सारस एक्सप्रेस गोंदिया-

.         सारस एक्स्प्रेस गोरेगाव
दि.6 सप्टेंबर रोजी गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा अंतर्गत बोरगाव या गावात दूषित पाण्यामुळे अतिसारचे २३ रुग्ण आढळले.त्यापैकी 22 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा येथील बाह्यरुग्ण ओपीडी येथे औषधोपचार देण्यात आला तर एका रुग्ण भरती असुन त्याची प्रकृती ठिक आहे.गावातील साथ आटोक्यात व परिस्थिती नियंत्रणात आहे.जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या बोरगाव येथे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,गट विकास अधिकारी श्री.धोटे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल व गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण  यांनी संपूर्ण वैद्यकीय व प्रशासकीय फौजफाट्यासह बोरगावला तातडीने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.डॉ गोल्हार यांनी संबधिताकडुन पाणी शुद्धीकरण बाबत माहिती घेतली.पुढील सात दिवस त्याठिकाणी आरोग्य शिबीर लावणे,साथरोग भागात मेडिक्लोर व आवश्यक औषधी वाटप करणे तसेच गावात नळ योजना असून त्याची दररोज शुद्धीकरण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात.
डॉ.गोल्हार यांनी पथकासह गावात अचानक भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली असता गावात वाढणारे रुग्ण आणि स्वच्छतेचा अभाव पाहता त्यांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेला आणि ग्रामपंचायतीला कडक शब्दांत निर्देश दिले आहेत.
घरोघरी जाऊन रुग्णांची चौकशी व वैद्यकीय उपचार
बोरगावात ताप आणि जलजन्य आजारांचे रुग्ण आढळल्याने DHO डॉ.गोल्हार,THO डॉ.चव्हाण आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका हेडाऊ व डॉ.आचल यांनी बाधित रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गावात तात्काळ विशेष आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले असून, डॉ.प्रियंका हेडाऊ व डॉ.आचल यांच्या देखरेखीखाली रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहेत.आशा स्वंयसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.साथरोग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत आरोग्य पथक बोरगावात तळ ठोकून राहणार आहे.गावात साथरोग आटोक्यात असुन नियंत्रणात असली तरी लोक सहभाग फार महत्वाचे असल्याचे डॉ.गोल्हार यांनी स्पष्ट केले आहे.
स्वच्छता आणि शुद्ध पाण्याचे आदेश-
गोरेगाव खंड विकास अधिकारी श्री.धोटे आणि आरोग्य विस्तार अधिकारी श्री.पटले यांनी गावातील स्वच्छतेची पाहणी करून ग्राम अधिकाऱ्यांना तातडीने नाल्या उपसण्याचे व स्वच्छता मोहीम राबवण्याचे कडक निर्देश दिले.पाण्याच्या स्रोतांमध्ये टीसीएल पावडर टाकून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.नागरिकांनीही पाणी उकळून व गाळून प्यावे आणि आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' पाळावा, असे आवाहन गोरेगाव तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेची मोठी उपस्थिती-
या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यादरम्यान तालुका आरोग्य अधिकारी(THO) डॉ.विनोद चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या सोबतीला गावातील सरपंच मनिषा चोपकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.अग्रवाल, आरोग्य विस्तार अधिकारी श्री.पटले, बोरगाव क्षेत्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका हेडाऊ व डॉ.आचल उपस्थित होत्या.तसेच गावातील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी आणि ग्राम अधिकारी यांनीही या दौऱ्यात सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निर्देश:
 शुद्ध पाणीपुरवठा व टीसीएल फवारणी: गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तातडीने तपासणी करून विहिरी व टाक्यांमध्ये टीसीएल पावडर टाकून पाणी शुद्ध करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आले.
आरोग्य छावणी (Health Camp): बोरगाव येथे बाधित रुग्णांसाठी तातडीने विशेष आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले असून, गावात औषध साठा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन:डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' म्हणून पाळावा आणि कुठेही पाणी साचू देऊ नये, असे आवाहन डॉ.गोल्हार यांनी केले.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post