न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर :
लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा जनार्दन बाबर (वय ४५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मांजरी येथील शितलादेवी मंदिर, मांजरी मंगळवारी (दि. ८) रात्री ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ५७ वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या मुलीविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या मुलाला उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी बाबर यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
बाबर यांनी दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी ५० हजार रुपये, तर जामीन अर्जासाठी दोन लाख रुपये, अशी एकूण अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचे लाच लुचपत विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पडताळणीदरम्यान दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी ५० हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याने मांजरी येथील शितलादेवी मंदिर, मांजरी, श्रीकांत ट्रेडिंग कंपनी, मांजरी सापळा रचला. तक्रारदाराकडून सियाज कारमध्ये ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच बाबर यांना रात्री ११ वाजून २ मिनिटांनी ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर, पोलिस हवालदार दीपक काकडे, अंमलदार भूषण ठाकूर, वैशाली माकर या पथकाने केली.
Post a Comment