गोरेगाव: ५६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर* सारस एक्सप्रेस

            सारस एक्सप्रेस 
गोरेगाव येथील पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी बुधवार (ता ०९) तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचे  सरपंच पदाचे सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता  आरक्षण जाहीर केले आहे . 
    यावेळी नायब तहसीलदार रमेश अल्लेवार,सभापती चित्रकला चौधरी, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
अनुसूचित जाती सरपंच पदाकरीता ०७ यात ०४ महीला , अनुसूचित जमाती ०८ सरपंच यात ०४ महीला , नामाप्र १३ सरपंच यात ०७ महीला खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)२८ सरपंच राखीव यात १३ महीला असे ५६ सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
अनुसूचित जातीकरीता राखीव कवलेवाडा, कटंगी, घुमर्रा अनुसूचित जाती महीला राखीव  कुऱ्हाडी , हिरापूर, तेलनखेडी, आंबेतलाव 
   अनुसूचित जमाती राखीव पुरगाव, बघोली ,हिराटोला, तुमसर व अनुसूचित जमाती महीला राखीव पालेवाडा,गणखैरा,हिरडामाली,म्हसगाव या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरीता 
 पिपरटोला तानु,कमरगाव, गिधाडी, सोनेगाव, मुरदोली, घोटी नागरीकांचा मागास प्रवर्ग  महीला सरपंच राखीव तिल्ली, निंबा, पलखेडा, तुमखेडा बुजरुक, खाडीपार, मलपुरी, सोनी या ग्रामपंचायतीत महीला राखीव आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 
सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच पदाकरीता 
पाथरी, मुंडीपार, आसलपाणी, बोरगाव, डव्वा,बबई, चिल्हाटी, कालीमाटी, पिंडकेपार, सटवा, बोटे, कलपाथरी, गोंदेखारी, तिमेझरी, मोहगाव तिल्ली व सर्वसाधारण महीला राखीव करीता भडंगा,बाम्हणी,मोहाडी,झांजिया, हौसीटोला,मेंगाटोला,तेढा,सिलेगाव, दवडीपार,चोपा,शहारवाणी,मोहगाव बुजरुक,चिचगाव या  ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण महीला आरक्षण तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी जाहीर केले आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post