पिंडकेपार: इडा पिडा घेऊन जा गे मारबत...पहाटे ५.३० वाजता निघणार मिरवणूक भरत घासले

          प्रतिनिधी भरत घासले 
पिंडकेपार या गावी नेहमीच श्रद्धा, धार्मिक कार्यक्रम, पारंपरिक पद्धतीनुसार सण ,उत्सव, विविध महापुरुषांच्या जयंत्या , इतिहास, सामाजिक उपक्रम,जन जागृतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात एकोप्याने साजरे केले जाते. त्यामुळे गावाची एकता प्रत्येक विधायक कार्यात दिसून येते व पारंपारिक संस्कृतीचे जतन सुद्धा या निमित्ताने केले जाते. 
 पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या निमित्ताने निघणाऱ्या मारबत या मिरवणुकीत पिंडकेपारवासी  'ईडा पिडा घेऊन जा गे मारबत' अशा घोषणा देत मोठ्या उत्साहात गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.  या दरम्यान समाजातील अनिष्ट प्रथा, रोगराई आणि वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात या हेतूने इडा - पिडा घेऊन जागे मारबत.. अशा अनेक प्रकारच्या घोषणा सुद्धा ऐकायला मिळणार आहेत.या संदर्भात माहिती देण्यात येत आहे की पिंडकेपार येथील हनुमान मंदिर व दुर्गा मंदिर परिसरातून  पहाटे ५.३० वाजता मारबत ची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीला यशस्वी करण्यासाठी युवकांचे  प्रयत्न सुरू आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post