सारस एक्स्प्रेस गोंदिया
जिल्हयात नेहमीच चर्चेत राहणार्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून २१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेला महिन्याहून अधिक कालावधी लोटला असतानाही ग्रामसभेची प्रोसीडिंग अद्याप बंद करण्यात आलेली नसल्याची तक्रार येथील उपसरपंच रोशन शिवणकर यांनी केली आहे. यासंदर्भात पंचायत समितीकडे तक्रार करूनही कारवाई झालेली नसल्याचा आरोप गुरुवारी २४ सप्टेंबर गोंदिया येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.
शिवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेला १ हजार ५०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आले होते तर या ग्रामसभेत अनेक महत्वाचे ठराव घेत घेतल्याचे बोलले जात होते. मात्र, उपस्थितीची माहिती मागविल्यानंतर प्रत्यक्षात ३२७ ग्रामस्थ उपस्थित असल्याचे समोर आले असताना बहूतांश ठरावच घेतले नसल्याचे दिसून आले असल्याचा दावा शिवणकर यांनी केला आहे. शिवणकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामसभेची प्रोसीडिंग सात दिवसांत पूर्ण करून बंद करणे अपेक्षित आहे. मात्र, ग्रामसभा होऊन महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही प्रोसीडिंग खुली असल्याने त्यात फेरफार होण्याची शक्यता असल्याचा आरोप शिवणकर यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गटविकास अधिकारी सडक अर्जुनी यांच्याकडे केली असून अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने राजकीय दबावात हा सर्व प्रकार घडत असल्याचा आरोपही शिवणकर यांनी केली आहे.
उपसरपंचांनी केलेली तक्रार प्राप्त झाली आहे. नियमानुसार सात दिवसांत ग्रामसभेची प्रोसीडिंग बंद करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र देऊन माहिती मागविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- यशवंत पटले, विस्तार अधिकारी, पंचायत समिती सडक अर्जुनी
...
Post a Comment