डी.जे. व साऊंड सिस्टिम चालकांवर कारवाई९ गुन्ह्यात २४.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त !

       सारस एक्स्प्रेस गोंदिया 
गोंदियाः सार्वजनिक ठिकाणी उच्च आवाजात डी. जे. व साऊंड सिस्टिम वाजवून ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध गोंदिया पोलीस प्रशासनाने धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डी.जे. चालक व मालकांवर कारवाई करत गोंदिया जिल्हा पोलिसांनी एकूण ९ गुन्हे दाखल केले असून १३ आरोपींना निष्पन्न केले आहे. या कारवाईत डी. जे. सिस्टिम, साऊंड मिक्सर व वाहनांसह तब्बल २४ लाख ६४ हजार रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील चावडी चौक, छोटा गोंदिया येथे उच्च डेसिबलच्या आवाजात डी. जे. चालवणारा मालक नंदकिशोर बुधराम राऊत याच्यावर गुन्हा दाखल करून १९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच रामनगर पोलीस स्टेशनअंतर्गत तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये विद्यानगर टोली, बी.टी. टोली येथे कारवाई करत आरोपी राकेश भाऊराव गजभिये, अंकित महेंद्र नागोसे व हिरेश नंदलाल घारपिंडे यांच्याकडून १५ हजार रुपयाचा माल जप्त केला. आंबेडकर
चौक, कुडवा येथे आरोपी सोहेल सलीम शेख याच्याकडून ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर रेल्वे चौकीजवळ, कटांगीटोला येथे आरोपी दिनेश देवीलाल भगत याच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत ताडाटोली अदासी येथे चंद्रप्रकाश दीनदयाळ भांडारकर व सचिन भांडारकर यांच्याकडून २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पांढराबोडी येथे आरोपी तनुज कृष्णा यादव याच्याकडून ३ लाख ५० हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गोरेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत गोरेगाव येथील पवन तलावाजवळ आरोपी राकेश दीनदयाळ अगळे व तुषार मनोहर चव्हाण यांच्याकडून ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रावणवाडी पोलीस स्टेशनअंतर्गत दासगाव येथे कारवाई करत आरोपी चालक दुर्गेश भोजराज तूरकर व मालक देवानंद बाबू कटरे यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post