कार्यालयात तंबाखू खाणे पडले महाग! गोंदिया झेडपी परिसरात १४ कर्मचाऱ्यांकडून २,७५० रुपयांचा दंड वसूलसारस एक्सप्रेस 17 अक्टूबर2026

   सारस एक्सप्रेस 17 अक्टूबर2026
गोंदिया: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया अंतर्गत दि. १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात एक मोठी धडक कार्यवायी (धाडसत्र) राबविण्यात आली. या कार्यवाही दरम्यान तंबाखू नियंत्रण कोटपा (COTPA) कायदा २००३ चे उल्लंघन करणाऱ्या १४ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून एकूण २,७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही धडक कार्यवाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे आणि पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शासकीय कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद आवारात अचानक हे धाडसत्र टाकण्यात आले होते.
सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा मौखिक अधिकारी डॉ.अनिल आटे, जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा आझाद मेश्राम व संध्या शंभरकर, दंत तंत्रज्ञ यश जयस्वाल, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे तसेच महिला पोलीस शिपाई सीमा शहारे आणि पायल प्रधान यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी केली.
कार्यवाही सोबतच पथकाद्वारे जिल्हा परिषद परिसरात उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तंबाखूच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शासनाच्या टोल फ्री क्रमांकाची माहिती देण्यात आली, तसेच कोटपा कायदा २००३ अंतर्गत आय.ई.सी. (माहिती, शिक्षण आणि संवाद) साहित्याचे वाटप करून तंबाखू सोडण्याचे आवाहन करण्यात आले. शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूमुक्त वातावरण राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post