युवकाने घेतला गळफास महागाव येथील घटना मृतकाचे नाव अनिल पवार मृत्यूचे कारण गुलदस्त्यात सारस एक्सप्रेस नेटवर्क

         सारस एक्सप्रेस नेटवर्क 
अर्जुनी मोर तालुक्यातील शिरोली महागाव येथील तीस वर्षीय युवक अनिल करण सिंह पवार यांनी स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिनांक 17 ऑक्टोंबर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घटना उघडकीस आली या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे 
मिळालेल्या माहितीनुसार अनिल पवार हे शनिवारी सकाळी दहा वाजता पासून बेपत्ता होते कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते त्यांचा मोठा भाऊ सुनील पवार हे त्यांचा शोध घेत असताना शेताजवळ मृतक अनिल यांची गाडी आढळून आली गाडी आढळून आल्याने त्यांनी शेतात शोध घेतला असता अनिल यांचा मृतदेह निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले युवकाच्या मृत्यू मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पुढील तपास अर्जुनी मोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार हर्षे पोलीस कर्मचारी कांबळे पोलीस कर्मचारी भोयर पुढील तपास करीत आहेत पोलिसांच्या पुढील तपासात अनिलच्या मृत्यू मागील रहस्य उलघडेल

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post