अर्जुनी मोरगावात दुष्काळ जाहीर करणे हास्यास्पद !
भरलेले तलाव आणि डोलणारे पीक असताना शेतकरी संतापले
नवेगावबांध : महाराष्ट्र शासनाने 'ट्रिगर-२'
अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत केल्याने येथील शेतकरी वर्ग मोठ्या आश्चर्यात सापडला आहे. या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तालुक्यात दुष्काळसदृश कोणतीही परिस्थिती नसताना शासनाने हा निर्णय लादणे हास्यास्पद असून, यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडत आहे. सध्या नवेगावबांध परिसरासह संपूर्ण तालुक्यात जलसाठे तुडुंब भरले असून, शेतकऱ्यांचे धान्याचे पीक शेतात डोलत असताना शासनाचा हा निर्णय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.
एकीकडे निसर्गाच्या कृपेने पीक उत्तम असताना, प्रशासनाने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून घेतलेल्या या एकतर्फी निर्णयामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ट्रिगर दोन अंतर्गत दुष्काळ घोषित केल्यानंतर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ज्या ठराविक भागातील शेतकऱ्यांचे खरोखरच काही नुकसान झाले असेल किंवा पाण्याअभावी ज्यांचे धान करपले असेल, त्यांचे योग्य ते पंचनामे करून त्यांना निश्चितच दिलासा देण्यात यावा. परंतु, जेथे पीक उत्तम आहे आणि
अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगावबांध सारखा भव्य जलाशय तुडुंब भरलेला आहे. डोळ्यांसमोर धान्याचे उत्तम उत्पन्न उभे असताना तालुक्यात दुष्काळ घोषित करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखा प्रकार आहे. प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. शासनाने तात्काळ हेक्टरी ५० क्विंटल धान खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा.
- ललित नाकाडे, रा. कोरंभीटोला
जलसाठे पूर्ण भरलेले आहेत, अशा संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्याला सरसकट दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. अनावधानाने किंवा घाईगडबडीत दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा, शासनाने सन २०२५ च्या खरीप हंगामातील बोनस दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा आणि आधारभूत धान खरेदी केंद्रांचे कामकाज तातडीने सुरू करावे. खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना पंचनाम्याद्वारे मदत देऊन आणि धान खरेदी सुरळीत करूनच प्रशासनाने शेतकन्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी नवेगावबांध परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
आमच्या भागातील पीक सर्वतोपरी सुरक्षित आणि उत्तम दर्जाचे आहे. याउलट शासनाने दुष्काळ घोषित करण्याऐवजी धान खरेदी केंद्र लवकर सुरू करून धानाची खरेदी सुरू करायला हवी होती. एका बाजूला जिल्ह्याची पैसेवारी ९५ पैशांच्या वर दाखवली जाते आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ घोषित केला जातो, हा विरोधाभास संतापजनक आहे.
सुधाकर बाळबुद्धे, रा. नवेगावबांध/कोहळीटोला
Post a Comment