जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
सडक अर्जुनी परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुग्गीपार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी ताराचंद दामाजी माहुरे (वय ५७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तहसील कार्यालयातील गांधी जयंतीच् बंदोबस्त आटोपून मोटरसायकलने सौंदडकडे जात असताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ताराचंद माहुरे हे दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी हून सौंदडकडे सुपर स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एमएच ३६ व्ही ८०२३ वरून जात होते. चुलबंद नदी पुलाच्या आधी तिडका फाट्याजवळ महामार्गावर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४९ सीडब्ल्यू १९३७ ने त्यांच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली.या धडकेत ताराचंद माहुरे हे मोटरसायकलसह महामार्गाच्या बाजूच्या रेलिंगवर जाऊन आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांच्या तोंडातून व कानातून रक्तस्राव होत असल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी भंडारा येथील लक्ष दवाखान्यात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात येत होते. नागपूरकडे नेत असताना रात्री सुमारे १० वाजता त्यांचे निधन झाले.
Post a Comment