सारस एक्सप्रेस गोंदिया
वन क्षेत्र नागझिरा अभयारण्य गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या नागिरा कोर सहन क्षेत्रातील नियत क्षेत्र थाटेझरी
सारस एक्सप्रेस गोंदिया मृत अवस्था मध्ये मिळाला वाघ. वन क्षेत्र नागझिरा अभयारण्य गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या नागिरा कोर सहन क्षेत्रातील नियत क्षेत्र थाटेझरी
बीटात एक मृत वाघ मिळाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या संदर्भात माहिती देण्यात येत आहे की १० नोव्हेंबर २०२६ रोजी वनपरिक्षेत्र नागझिरा (स्थित गोरेगाव) अंतर्गत नागझिरा कोअर सहवनक्षेत्रातील नियतक्षेत्र थाडेझरी बिटात सामुहीक गस्ती दरम्यान कक्ष क्रमांक ९९ राखीव वन परिसरात एक नर वाघ मृत अवस्थेत दिसुन आले. सदर घटना निदर्शनास येताच तात्काळ वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
सदर घटनेची माहीती प्राप्त होताच माननीय, पियुषा जगताप उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, प्रीतमसिंग कोडापे, उपसंचालक नागझिरा खंड, गोंदिया, विपीन लांडगे, सहायक वनसंरक्षक, महेन्द्र भांगरे, गस्ती पथक गोंदिया, श्रीमती ए. व्ही. लांबट, वनपरिक्षेत्र अधिकारी, नागझिरा, हे घटनास्थळी दाखल झाले.
राष्ट्रीय संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभुत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीव्दारे घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी करण्यात आली. सदर समितीमध्ये मा. सावंत बहेकार, मानद वन्यजीव रक्षक गोंदिया, मा. रुपेश निवातें NTCA प्रतिनीधी गोंदिया, मा. इद्रिस अहमद WTI सदस्य, मा. पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता. मा. पशुवैद्यकीय अधिकारी चमुव्दारे समिती सदस्यांचे उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले व वाघाचे व्हीसेरा सॅम्पल उत्तरीय तपासणी करीता संकलित करण्यात आले आहेत.
मृत नर वाघ असून प्रथम दर्शनी वाघाची मृत हा विद्युत प्रवाहामुळे झाल्याचे निर्दशनास आलेले आहे असे मा. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविलेला आहे. मृत वाघाचे सर्व अवयव साबुत अवस्थेत आढळून आलेले असून शवविच्छेदानंतर वाघाचे पंचासमक्ष दहन करण्यात आले आहे. सदर प्रकरणी तपास . पियुषा जगताप उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, . प्रोतमसिंग कोडापे, उपसंचालक नागझिरा खंड, गोंदिया, यांचे मार्गदर्शनात विपीन लांडगे, सहायक वनसंरक्षक नागझिरा (वन्यजीव) व श्रीमती ए. व्ही. लांबट, वनपरिक्षेत्र अधिकारी, नागझिरा हे करीत आहेत. सदर घटनेबी पुढील तपास व चौकशी सुरू आहे.
Post a Comment