कृषी यांत्रिकीकरणाला गती; 2025-26 मध्ये लाभार्थ्यांची झपाट्याने वाढ सारस एक्सप्रेस गोंदिया, दि. 17 :

     सारस एक्सप्रेस गोंदिया, दि. 17 : जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात येत असून, चालू 2025-26 वर्षात या उपक्रमाला विशेष गती मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, यावर्षी लाभार्थ्यांची संख्या आणि खर्च दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
   कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या तीन प्रमुख योजनांद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे.
   2022-23 मध्ये एकूण 1512 लाभार्थ्यांना सुमारे 1215.67 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. त्यानंतर 2023-24 मध्ये 575 लाभार्थी आणि 575.21 लाख रुपये, तर 2024-25 मध्ये 303 लाभार्थी आणि 290.93 लाख रुपये खर्च नोंदवला गेला.
  मात्र, 2025-26 या वर्षात मोठी झेप घेत 2552 लाभार्थ्यांना सुमारे 3034.43 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या आकड्यांवरून कृषी यांत्रिकीकरणाबाबत शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आणि प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी स्पष्ट दिसून येते.
  यामुळे शेतीतील मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
 कृषी यांत्रिकीकरण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असून, भविष्यातही या योजनांचा विस्तार केल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم