आदिवासी विभागाच्या चौकीदार पदासाठी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर 28 जुलै ते 1 ऑगस्ट कालावधीत परीक्षेचे आयोजन देवरी येथे 29 जुलै रोजी होणार परीक्षा सारस एक्सप्रेस दि.17 :

         सारस एक्सप्रेस  दि.17 : 
आदिवासी विकास विभागामार्फत दि.29 एप्रिल 2026 रोजी चौकीदार (गड-ड) या संवर्गाची 478 पदाकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर पद भरती 2026 ‘चौकीदार (गड-ड)’ या पदासाठी लेखी परीक्षेचे वेळापत्रक, आयुक्त आदिवासी विकास विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार लेखी परीक्षा दिनांक 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2026  या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
         त्यानुसार प्रकल्प कार्यालय कळवण व चिमुर- 28 जुलै. चंद्रपूर, वर्धा, नागपूर व भंडारा-28 जुलै. अकोला व घोडगाव- 29 जुलै. पुसद, राजुर, देवरी, यावल व भामरागड- 29 जुलै. तळोदा, जव्हार, शहापूर, सोलापूर, किनवट व कळमनुरी- 30 जुलै. डहाणू व छत्रपती संभाजीनगर- 30 जुलै. धारणी, नंदुरबार व पेण- 31 जुलै. धुळे, गडचिरोली, पांढरकवड व अहेरी- 31 जुलै. नाशिक- 1 ऑगस्ट 2026 रोजी परीक्षा होणार आहे.
  उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्रे (Hall Tickets) परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध करुन दिली जातील. परीक्षा केंद्र, ठिकाण आणि इतर सर्व मार्गदर्शक सूचना प्रवेश पत्रावर उपलब्ध असतील. 
 उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करुन करण्यासाठी व अधिक माहितीसाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://tribal.maharashtra.gov.in यावर  https://tdewatchman2026.cbtexam.in या लिंकला उपलब्ध करुन दिली जाईल. सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाऊनलोड करावे. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.

0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم