सारस एक्स्प्रेस | सडक अर्जुनी
तालुक्यातील खोडशिवनी शेतशिवारात विद्युत प्रवाह असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने योगराज माधवराव कापगते (वय ४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या योगराज यांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
तक्रारीच्या आधारे दोघांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात कायमी अपराध क्रमांक ५१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. पुढील तपास ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सपोनि जावेद शेख, पोलीस स्टेशन डुग्गीपार करीत आहेत. दाखल अधिकारी म्हणून पोहवा. कापसे यांनी कार्यवाही केली आहे.
अनधिकृत वीज जोडणी टाळण्याचे आवाहन
शेतीसाठी विजेच्या पोलवरून थेट तार जोडणे किंवा अनधिकृत पद्धतीने वीज घेणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा प्रकारामुळे गंभीर अपघात आणि जीवितहानीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत वीज जोडणीचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Post a Comment