सारस एक्सप्रेस नेटवर्क गोंदिया
गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथील नवयुवक शारदा उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आज 23 ऑक्टोबर रोज शुक्रवार ला संध्याकाळी शारदा मातेची आरती झाल्यानंतर 7.०० वाजेपासून महाप्रसाद भाविकांसाठी सुरू होणार असून, परिसरातील सर्व नागरिकांनी आणि भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे कळकळीचे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
नवयुवक शारदा उत्सव मंडळ, पिंडकेपार तर्फे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या महोत्सवाची सांगता आणि मातेचा आशीर्वाद म्हणून या विशेष महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाची सर्व तयारी पूर्ण झाली असून शिस्तबद्ध नियोजनासाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज आहेत.
भक्तीभावाने लाभ घेण्याचे आवाहन:
मंडळाच्या वतीने सर्व माता-भगिनींना आणि भाविक भक्तांना विनंती करण्यात आली आहे की, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि उत्सव यशस्वी करावा.
वृत्त संकलन :भरत घासले
Post a Comment